नक्षलवाद्यांचा कॅम्प पोलिसांकडून उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:21 IST2017-08-14T05:21:21+5:302017-08-14T05:21:21+5:30
गडचिरोली आणि नारायणपूर (छत्तीसगड) जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाड जंगलातील नक्षलवाद्यांचा कॅम्प गडचिरोली पोलिसांनी शनिवारी दुपारी उद्ध्वस्त केला.

नक्षलवाद्यांचा कॅम्प पोलिसांकडून उद्ध्वस्त
गडचिरोली : गडचिरोली आणि नारायणपूर (छत्तीसगड) जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाड जंगलातील नक्षलवाद्यांचा कॅम्प गडचिरोली पोलिसांनी शनिवारी दुपारी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी येथून तीन भरमार रायफली, सहा घोडे व अन्य नक्षल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले.
अबूझमाड भागात नक्षल कॅम्प असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचे विशेष अभियान पथक शनिवारी तुंडेवारा व पोकनार गावाजवळील जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दुपारी २च्या सुमारास पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता.