गडचिरोली जिल्ह्यात गावकऱ्यांनी जाळले नक्षली बॅनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 18:54 IST2020-05-16T18:53:47+5:302020-05-16T18:54:15+5:30
गेल्या २ मे रोजी उडालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली नेता सृजनक्का हिला ठार केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेले बॅनर गावकऱ्यांनी काढून गावात आणले आणि त्याची होळी केली.

गडचिरोली जिल्ह्यात गावकऱ्यांनी जाळले नक्षली बॅनर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या २ मे रोजी उडालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली नेता सृजनक्का हिला ठार केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेले बॅनर गावकऱ्यांनी काढून गावात आणले आणि त्याची होळी केली.
धानोरा ते मुरूमगाव मार्गावर धानोरापासून ३ किमी अंतरावर सालेभट्टी नदीजवळ रस्त्यालगत हे बॅनर बांधले होते. पोलिसांना त्याची माहिती दिल्यानंतर शनिवारी (दि.१६) हे बॅनर काढून गावात आणले आणि नक्षलविरोधी घोषणा देत बॅनर जाळले.