वासामुंडी जंगलात नक्षल चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:57 IST2019-03-23T00:56:43+5:302019-03-23T00:57:02+5:30
एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी जंगलात पोलीस व नक्षल यांच्या मध्ये गुरूवारी पहाटे चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षल साहित्य जप्त केले आहेत.

वासामुंडी जंगलात नक्षल चकमक
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी जंगलात पोलीस व नक्षल यांच्या मध्ये गुरूवारी पहाटे चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षल साहित्य जप्त केले आहेत.
वासामुंडी जंगलात जलद प्रतिसाद जवानांकडून नक्षलविरोधी मोहीम राबविली जात असताना पहाटेच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांवर गोळीबार केला. पोलीस आपल्यावर भारी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून जंगलात पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसराची पाहणी केली असता, नक्षलवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने स्वत:जवळ बाळगलेला २.५ किलो वजनाचा एक आयईडी, एक किलो वजनाचे गन पावडर, दोन जीवंत डिटोनेटर व नक्षल वापरत असलेले पिट्टू तसेच नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. या भागात नक्षल शोधमोहीम वाढविण्यात आली आहे.