शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

नवोदयने उच्च दर्जाचे विद्यार्थी घडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:00 AM

सन १९८७ ला स्थान झालेले जवाहर नवोदय विद्यालयात सुरूवातीला प्रचंड अडीअडचणी होत्या. अनेक अडचणीतून हे विद्यालय पुढे आलेले आहे. त्यात माजी प्राचार्य म्हणून सन १९९२ ते १९९६ या कालावधीत डॉ.जॉन्सन यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळून येथील शिक्षणाचा दर्जा उंचावला. त्यामुळे डॉ.जॉन्सन यांना कन्याकुमारी येथून विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमाला बोलाविण्यात आले होते.

ठळक मुद्देवाय.आर.जॉन्सन यांचे प्रतिपादन : घोट येथील माजी विद्यार्थी मेळाव्यात खासदारांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातून विद्या प्राप्त करून अनेक विद्यार्थी घडले आहेत. देशात व विदेशात उच्च पदावर कार्यरत असलेले उच्च दर्जाचे विद्यार्थी या शाळेने घडविले असून असे विद्यार्थी घडविण्याचे काम सुरूच आहे, असे प्रतिपादन डॉ.वाय.आर.जॉन्सन यांनी केले.स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयात ८ डिसेंबर रोजी रविवारला माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून खा.अशोक नेते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य नागेश्वरराव उपस्थित होते. याशिवाय भाजपचे पदाधिकारी प्रकाश गेडाम, स्वप्नील वरघंटे, ज्येष्ठ शिक्षक राजन गजभिये, घोटचे सरपंच विनय बारसागडे, नवोदय पालक समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश साखरे, श्यामराव कोरेटी, अभय नन्नावरे आदी मान्यवर उपस्थित होते.सन १९८७ ला स्थान झालेले जवाहर नवोदय विद्यालयात सुरूवातीला प्रचंड अडीअडचणी होत्या. अनेक अडचणीतून हे विद्यालय पुढे आलेले आहे. त्यात माजी प्राचार्य म्हणून सन १९९२ ते १९९६ या कालावधीत डॉ.जॉन्सन यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळून येथील शिक्षणाचा दर्जा उंचावला. त्यामुळे डॉ.जॉन्सन यांना कन्याकुमारी येथून विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमाला बोलाविण्यात आले होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांचा शाल, श्रीफळ देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नेस्मो, नवोदय एक्स स्टुडंट, मल्टी पर्पज ऑर्गनायझेशनच्या वतीने या शाळेतील ३१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जवाहर नवोदय विद्यालयाच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरू असून जोपर्यंत या शाळेच्या समस्या पूर्णत: मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक हितेश परमार, संचालन धीरज खोब्रागडे यांनी केले तर आभार उमाकांत पिपरीकर यांनी मानले.शिबिरात २४ माजी विद्यार्थ्यांनी केले रक्तदानघोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिरात या शाळेच्या २४ माजी विद्यार्थ्यांनी स्वच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. यामध्ये रक्तदात्यांमध्ये डॉ. प्रणव आखाडे, डॉ. जयंत पर्वते, डॉ. स्नेहा पर्वते, डॉ. सचिन मडावी, डॉ. चंद्रशेखर श्यानगोंडा, अरूण सिडाम, प्रा. राकेश चडगुलवार, आशिष सोरते, परीक्षित दुर्गे, श्रद्धा नैताम, दीपक पुंगाटी, राजू मडावी, स्वप्नील भोवरे, कर्मा खोब्रागडे, धीरज निशाने, सुनील खोब्रागडे, मनोज झाडे, अतुल फुलझेले व सूरज कोडाप आदींचा समावेश आहे. शासकीय रक्तपेढीला ३० बॅग रक्त प्रदान करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा संक्रमण अधिकारी डॉ. अंजली साखरे, डॉ.यशवंत दुर्गे, अनिल तिडके, जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सतीश तडकलावार यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.

टॅग्स :Educationशिक्षण