नवेगावात पोहोचली : आमदारांनी केले पदयात्रेकरूंना मार्गदर्शन
By Admin | Updated: December 20, 2015 01:20 IST2015-12-20T01:20:27+5:302015-12-20T01:20:27+5:30
सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली परिसरातच उभारण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर १७ मागण्यांसाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या वतीने १३ डिसेंबरपासून सूरजागड....

नवेगावात पोहोचली : आमदारांनी केले पदयात्रेकरूंना मार्गदर्शन
सूरजागड पदयात्रेचे तळोधीत स्वागत
तळोधी (मो.) : सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली परिसरातच उभारण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर १७ मागण्यांसाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या वतीने १३ डिसेंबरपासून सूरजागड येथून पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. सदर पदयात्रा चामोर्शीवरून शनिवारी तळोधी मो. येथे पोहोचली. येथे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरजागड पदयात्रेचे उत्स्फुर्त स्वागत केले.
राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली सूरजागड-गडचिरोली पदयात्रा तळोधी मो. येथे शनिवारी सकाळी पोहोचली. यावेळी तळोधी मो.चे उपसरपंच किशोर गटकोजवार, पोलीस पाटील अनिल कोठारे, तंमुस अध्यक्ष परशुराम कुनघाडकर आदीसह शेकडो नागरिकांनी प्रत्यक्ष पदयात्रेत सहभाग घेऊन पाठींबा दर्शविला. त्यानंतर सदर पदयात्रा नवेगाव येथील एका मंदिरात पोहोचली आहे. येथून सदर पदयात्रा गडचिरोलीकडे रवाना होणार आहे. (वार्ताहर)