दक्षिण गडचिरोलीत राष्ट्रवादी-भाजपला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:01 IST2018-03-01T00:01:11+5:302018-03-01T00:01:11+5:30
अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले. काही सरपंचांसह सदस्यपदावरून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळविले.

दक्षिण गडचिरोलीत राष्ट्रवादी-भाजपला यश
ऑनलाईन लोकमत
अहेरी/सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले. काही सरपंचांसह सदस्यपदावरून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळविले. सोबतच काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनाही यश आले. मात्र या परिसरात काँग्रेसचे उमेदवार आपले वर्चस्व दाखवू शकले नाहीत.
माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांच्या नेतृत्वात अहेरी तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आविसंच्या उमेदवारांना चांगलीच टक्कर दिली. तसेच एटापल्ली तालुक्यात हालेवाडा, सिरोंचा तालुक्यात कोटापल्ली येथे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. पोटनिवडणुकीत जांभिया व गट्टा येथे राष्ट्रवादीला यश मिळाले.
सिरोंचा तालुक्यात अंकिसा येथे भाजपच्या उमेदवारांनी यश मिळविले. इरतही ग्रामपंचायतीत भाजपचे काही उमेदवार विजयी झाले.