प्रलंबित मागण्यांसाठी १५ला राष्ट्रीय प्रतिराेध दिन पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:35+5:302021-07-08T04:24:35+5:30
कोरोना महामारीला ढाल बनवून केंद्र व राज्य सरकार कर्मचारी, कामगार, श्रमिक, शेतकरी व शेतमजूरवर्गाचे शोषण करीत आहे. प्रलंबित मागण्यांसंदर्भात ...

प्रलंबित मागण्यांसाठी १५ला राष्ट्रीय प्रतिराेध दिन पाळणार
कोरोना महामारीला ढाल बनवून केंद्र व राज्य सरकार कर्मचारी, कामगार, श्रमिक, शेतकरी व शेतमजूरवर्गाचे शोषण करीत आहे. प्रलंबित मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय प्रतिरोध दिवस पाळून व काळ्या फिती लावून कार्यालयासमोर निदर्शने करण्यात यावीत, यासाठी सभा घेण्यात आली. सभेला महासंघाचे राज्याध्यक्ष आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, जिल्हा परिषद महिला कर्मचारी समितीच्या सचिव माया बाळराजे, ग्रामसेवक युनियनचे विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, जिल्हाध्यक्ष कवीश्वर बनपूरकर, जिल्हा सरचिटणीस दामोधर पटले, कार्याध्यक्ष नवला घुटके, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, विस्तार अधिकारी जिल्हा संघटना सचिव ज्ञानेश्वर भोगे, लेखा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोत्तावार, कृषी तांत्रिक संघटनेचे वासुदेव कावरे, नारायण गेडाम, तालुका महासंघाचे अध्यक्ष अरविंद मांढरेवार, ग्रामसेवक युनियन जिल्हा जनरल काैन्सिलर विजय गडपायले, वंदना वाढई यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.