राष्ट्रीय महामार्गाने व्यावसायिक धास्तावले

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:30+5:302015-12-05T09:07:30+5:30

साकोली-गडचिरोली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ८० फूट रोड व फुटपाथ व पार्र्किंगसाठी ४० फूट जागा सोडावी लागणार आहे.

National highways commercially feared | राष्ट्रीय महामार्गाने व्यावसायिक धास्तावले

राष्ट्रीय महामार्गाने व्यावसायिक धास्तावले

फटका : अनेक इमारती होणार भुईसपाट
गडचिरोली : साकोली-गडचिरोली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ८० फूट रोड व फुटपाथ व पार्र्किंगसाठी ४० फूट जागा सोडावी लागणार आहे. या मार्गावरील अनेक दुकान व इमारती भुईसपाट होणार आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार असल्याने व्यावसायिक या मार्गाच्या निर्मितीमुळे प्रचंड धास्तावले आहेत.
साकोली-देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाची निविदा निघाली असून या मार्गाच्या बांधकामाचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. सदर मार्ग १६० फूट रूंदीचा राहणार असून रस्त्याच्या केंद्रस्थानापासून ८० फूट रस्ता तयार होणार आहे.
साकोली-देसाईगंज-गडचिरोली-सिरोंचा या मार्गासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय या मार्गाचे काम जपानच्या नामांकित कंपनीमार्फत होणार आहे. एका दिवशी ३० किमी अंतराच्या लांबीचा मार्ग या कंपनीचे कामगार व यंत्रणा करणार आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने होणार असल्याचे नियोजन शासनस्तरावर करण्यात आले आहे.
देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली या शहरात सध्या असलेल्या मुख्य मार्गालगत अनेक दुकाने व मोठ्या इमारती आहेत. पार्र्किंगची व्यवस्थासुद्धा नसल्याने या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.

Web Title: National highways commercially feared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.