राष्ट्रीय महामार्ग बायपास न्या
By Admin | Updated: December 23, 2015 01:48 IST2015-12-23T01:48:07+5:302015-12-23T01:48:07+5:30
जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग बायपास न्या
व्यापारी असोसिएशनची मागणी : खासदारांना शिष्टमंडळ भेटले
गडचिरोली : जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. मात्र हे चारही मार्ग शहराबाहेरून बायपास मार्गाने वळविण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली, धानोरा व चामोर्शी येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून सदर चारही महामार्ग बायपास मार्गाने करण्याची त्यांना विनंती करणार आहोत, असे आश्वासन खासदार नेते यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष गजानन येनगंधलवार, श्रीकृष्ण कावनपुरे प्रकाश अर्जुनवार, शशिकांत साळवे उपस्थित होते. गडचिरोली व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळात अध्यक्ष रवी चन्नावार, उपाध्यक्ष हरिष राठी, कोषाध्यक्ष मनोज ठाकूर, सचिव गुरूदेव हरडे, अनिल करपे, सलिम बुधवानी, फरिद नाथानी, कासीम धनानी, हेमंत राठी, किशोर जोगे, दया चौधरी, प्रफुल आंबोरकर, सुनिल हर्षे, सरफराज शेख, विशाल हल्दवालीया यांचा समावेश होता. तर धानोरा व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळात गजानन साळवे, विनोद निंबोरकर, सुभाष धाईत, प्रकाश धाईत, गीता वालको, रेखा हलामी, विजय कुमरे, कैलाश गुंडावार, भास्कर सोनुले, संतोष हरडे, दिलीप गावडे, विजय साळवे, अनंत साळवे, सदूभाई धनानी, बशिरभाई पिराणी, अल्लाउद्दीन लालानी आदी सहभागी होते. (स्थानिक प्रतिनिधी)