शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

नानुभाऊच्या चहाने घातली मंत्र्यांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

महेंद्र रामटेके लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : सायरन वाजवत मंत्री महोदयांच्या वाहनांचा ताफा येत होता. अचानक वाहनांची चाके मंदावतात ...

महेंद्र रामटेके

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : सायरन वाजवत मंत्री महोदयांच्या वाहनांचा ताफा येत होता. अचानक वाहनांची चाके मंदावतात आणि सर्वांची धावपळ होते. मंत्री महाेदय व्हीयआयपी गाडीतून खाली उतरतात आणि चक्क चहा पिण्यासाठी टपरीसमोर उभे राहतात. विश्वासच बसणार नाही, असा हा देखावा आरमोरीकरांनी पाहिला. चहा घेणारे ते मंत्री होते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि त्यांना गरमागरम चहा पाजणारा होता नानूभाऊ अर्थात ज्ञानेश्वर रामदास ढोरे.

मंत्री सामंत गडचिरोलीतील दिवसभराचे कार्यक्रम आटोपून गुरूवारी नागपूरच्या दिशेने निघाले होते. आरमोरीतील नवीन बसस्थानकजवळील फूटपाथवर असलेला ‘सुंदर चहा’चा बोर्ड त्यांना दिसला आणि त्यांना चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी क्षणाचाही विचार न करता, त्या चहा टपरीसमोर गाडी थांबवायला सांगितले. मंत्र्यांच्या व्हीआयपी गाडीसह सर्व ताफा इथे का थांबला, असा प्रश्न नानूभाऊसह तिथे उपस्थित सर्वांनाच पडला. पण मंत्री चक्क आपल्या कँटिनवर चहा पिण्यासाठी थांबले म्हटल्यावर नानूभाऊही हरखून गेला. चहा तयार हाेईपर्यंत जवळपास १५ ते २० मिनिटे ते कँटिनसमोर उभे होते. ज्ञानेश्वरने बनवलेला चहा पिऊन मंत्री सामंत खुश झाले. चहाचे कौतुक करत त्याच्यासोबत फोटोही काढले. सामंत यांच्यासह त्यांच्या ताफ्यातील जवळपास ४० लोकांनी ज्ञानेश्वरने बनवलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. यावेळी आरमोरी येथील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूरही उपस्थित होते. सामंत यांचा ताफा गेल्यानंतर मुंबई येथील मंत्रालयातील सामंत यांच्या कार्यालयातून ज्ञानेश्वर यांना फोन आला आणि त्यांची विचारपूस करण्यात आली, अशी माहिती ज्ञानेश्वरने ‘लोकमत’ला दिली.

एखादा मंत्री लहानशा चहा टपरीवर थांबून चहा पित असल्याचे दृष्य अभावानेच पाहायला मिळते. ‘आबा’ अर्थात आर. आर. पाटील यांच्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी हा अनुभव गडचिरोलीकरांना दिला. आरमोरीजवळच्या अरसोडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर रामदास ढोरे हा सुशिक्षित बेरोजगार युवक नोकरीच्या मागे न लागता, आरमोरीजवळील नवीन बसस्थानकाजवळ २०१५पासून चहाची टपरी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.

बाॅक्स.....

ट्वीटमधूनही केले कौतुक

ज्ञानेश्वर ढोरे यांच्या या चहाचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरूनही कौतुक केले. या ट्विटमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरसोबत काढलेले तीन फोटोही शेअर केले आहेत. यामुळे आरमोरीतील या चहाची महती सर्वत्र पसरली.