शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर मिळणार मतदार यादीतील नाव

By admin | Updated: September 25, 2014 23:23 IST

प्रत्येक मतदार मदत केंद्रावर बॅलेट, कंट्रोल युनिटच्या माध्यमातून प्रात्यक्षीक स्वरूपात मतदान करण्याबाबतची माहिती देण्यात येत आहे. तहसीलसमोरील मदत केंद्रात लॅपटॉप, इंटरनेटचा वापर केला जात

गडचिरोली : प्रत्येक मतदार मदत केंद्रावर बॅलेट, कंट्रोल युनिटच्या माध्यमातून प्रात्यक्षीक स्वरूपात मतदान करण्याबाबतची माहिती देण्यात येत आहे. तहसीलसमोरील मदत केंद्रात लॅपटॉप, इंटरनेटचा वापर केला जात असल्याने मतदाराला एका क्लिकवर मतदार यादीतील नाव शोधून दिले जाईल, अशी माहिती गडचिरोली विधानसभा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली आहे.शहरातील तहसील कार्यालयासमोरील मतदार मदत केंद्रात ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून मतदारांना माहिती दिली जात आहे. त्याबरोबरच नवीन मतदारांचे नाव, मतदानाचे ठिकाण यासंबंधीही माहिती उपलब्ध करू दिली जात आहे. शहरातील जि. प. शाळा, इंदिरा गांधी चौक, बसस्थानक, जिल्हा सामान्य रूग्णालय, रामनगर येथील न. प. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, गोकुलनगरातील क्रांतिज्योती प्राथमिक शाळा, नगर परिषद कॉम्प्लेक्स या ठिकाणी मतदान मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून मतदारांना मतदानासाठी जागृत केले जात आहे. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातूनही मतदारांना समजावून सांगितले जात आहे, अशी माहिती पी. शिवशंकर यांनी दिली आहे. शहरीभागात मदत केंद्रांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे. नव मतदारासह, मतदार आणि भावी मतदार मदत केंद्रांना भेटी देत आहेत. मदत केंद्रांमार्फत ग्रामीण भागातील मंडळनिहाय ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून १० वी व १२ वीतील विद्यार्थ्यांमध्येही मतदानाविषयी जागृती केली जात आहे, असे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी सांगितले. इंदिरा गांधी चौकात ए. आर. तुनकलवार, वाकडे, गेडाम, जि. प. शाळेत बी. डी. कावळे, काटकर आदी काम पाहत आहेत.