एका क्लिकवर मिळणार मतदार यादीतील नाव
By Admin | Updated: September 25, 2014 23:23 IST2014-09-25T23:23:24+5:302014-09-25T23:23:24+5:30
प्रत्येक मतदार मदत केंद्रावर बॅलेट, कंट्रोल युनिटच्या माध्यमातून प्रात्यक्षीक स्वरूपात मतदान करण्याबाबतची माहिती देण्यात येत आहे. तहसीलसमोरील मदत केंद्रात लॅपटॉप, इंटरनेटचा वापर केला जात

एका क्लिकवर मिळणार मतदार यादीतील नाव
गडचिरोली : प्रत्येक मतदार मदत केंद्रावर बॅलेट, कंट्रोल युनिटच्या माध्यमातून प्रात्यक्षीक स्वरूपात मतदान करण्याबाबतची माहिती देण्यात येत आहे. तहसीलसमोरील मदत केंद्रात लॅपटॉप, इंटरनेटचा वापर केला जात असल्याने मतदाराला एका क्लिकवर मतदार यादीतील नाव शोधून दिले जाईल, अशी माहिती गडचिरोली विधानसभा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली आहे.
शहरातील तहसील कार्यालयासमोरील मतदार मदत केंद्रात ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून मतदारांना माहिती दिली जात आहे. त्याबरोबरच नवीन मतदारांचे नाव, मतदानाचे ठिकाण यासंबंधीही माहिती उपलब्ध करू दिली जात आहे. शहरातील जि. प. शाळा, इंदिरा गांधी चौक, बसस्थानक, जिल्हा सामान्य रूग्णालय, रामनगर येथील न. प. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, गोकुलनगरातील क्रांतिज्योती प्राथमिक शाळा, नगर परिषद कॉम्प्लेक्स या ठिकाणी मतदान मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून मतदारांना मतदानासाठी जागृत केले जात आहे. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातूनही मतदारांना समजावून सांगितले जात आहे, अशी माहिती पी. शिवशंकर यांनी दिली आहे.
शहरीभागात मदत केंद्रांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे. नव मतदारासह, मतदार आणि भावी मतदार मदत केंद्रांना भेटी देत आहेत. मदत केंद्रांमार्फत ग्रामीण भागातील मंडळनिहाय ईव्हीएम मॉक पोलिंगच्या माध्यमातून १० वी व १२ वीतील विद्यार्थ्यांमध्येही मतदानाविषयी जागृती केली जात आहे, असे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी सांगितले. इंदिरा गांधी चौकात ए. आर. तुनकलवार, वाकडे, गेडाम, जि. प. शाळेत बी. डी. कावळे, काटकर आदी काम पाहत आहेत.