नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना पकडले
By Admin | Updated: June 8, 2017 01:34 IST2017-06-08T01:34:49+5:302017-06-08T01:34:49+5:30
तालुक्यातील येरकड येथे जाऊन ग्रामस्थांना आपण नक्षलवादी असल्याची बतावणी करून खंडणी मागणाऱ्या दोन इसमांना

नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील येरकड येथे जाऊन ग्रामस्थांना आपण नक्षलवादी असल्याची बतावणी करून खंडणी मागणाऱ्या दोन इसमांना ग्रामस्थांनी पकडून थेट धानोराच्या पोलीस ठाण्यात आणले. या दोघांवर वृत्त लिहिस्तोवर गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.
या घटनेसंदर्भात धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित ठिके, धानोराचे प्रभारी पोलीस निरिक्षक नरेंद्र मुंडे तसेच येरकड पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी देशमुख यांना विचारणा केली असता, सदर घटनेस त्यांनी दुजोरा दिला. नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना येरकड येथील ग्रामस्थांनी पकडले. त्या दोघांना धानोरा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी आणले. सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाचे तपासी अधिकारी येरकड पोलीस मदत केंद्राचे पीएसआय वराड हे आहेत, अशी माहिती येरकड पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी देशमुख यांनी दिली.