रमजान ईद निमित्त नमाज

By Admin | Updated: June 27, 2017 00:56 IST2017-06-27T00:56:15+5:302017-06-27T00:56:15+5:30

मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद निमित्त जिल्हाभरातील मुस्लीम बांधवांनी सोमवारी ईदगाहमध्ये जाऊन नमाज अदा केली.

Namaz on the occasion of Ramadan Id | रमजान ईद निमित्त नमाज

रमजान ईद निमित्त नमाज

मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद निमित्त जिल्हाभरातील मुस्लीम बांधवांनी सोमवारी ईदगाहमध्ये जाऊन नमाज अदा केली. त्याचबरोबर एकमेकांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या. पहिल्या छायाचित्रात सिरोंचा येथील मशिदीत, दुसऱ्या छायाचित्रात देसाईगंज येथील ईदगाहमध्ये नमाज अदा करताना मुस्लीम बांधव, तर तिसऱ्या छायाचित्रात देसाईगंज येथे चिमुकल्यांनी परस्परांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्यात रोजा ठेवला जातो. रोजा संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. ईदनिमित्त शेवयांची खीर, शीरखुरमा खाण्यासाठी आपल्या मित्र आणि आप्तगणांना बोलावले जाते. सोमवारी जिल्हाभरात रमजान ईद आनंदात साजरी करण्यात आली.

Web Title: Namaz on the occasion of Ramadan Id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.