नाईक बनले एटापल्लीतील पहिले पोलीस उपनिरीक्षक

By Admin | Updated: May 16, 2017 00:46 IST2017-05-16T00:46:34+5:302017-05-16T00:46:34+5:30

छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जारावंडी परिसरातील भापडा या नक्षलग्रस्त व जंगलाने वेढलेल्या ...

Naik became the first police sub-ins at Etapally | नाईक बनले एटापल्लीतील पहिले पोलीस उपनिरीक्षक

नाईक बनले एटापल्लीतील पहिले पोलीस उपनिरीक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जारावंडी परिसरातील भापडा या नक्षलग्रस्त व जंगलाने वेढलेल्या गावातील प्रकाश दामाजी नाईक यांनी एमपीएससी मार्फत घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एटापल्ली तालुक्यातील पहिले पोलीस उपनिरीक्षक बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
किर्र जंगलात वसलेल्या भापडा गावाच्या सभोवताल डोंगर आहे. या गावात जाण्यासाठी आधुनिक दळणवळणाची सोय नाही, मोबाईलचे क व्हरेज, इंटरनेटची सुविधा अजूनपर्यंत या गावामध्ये पोहोचली नाही. पावसाळ्यात नदीमुळे सुमारे चार महिने या गावाचा इतर गावांशी संपर्क होत नाही. अशा गावातील रहिवासी असलेले प्रकाश दामाजी नाईक यांनी एमपीएससीच्या मार्फतीने घेण्यात आली होती. खात्याअंतर्गतची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आर्थिक अडचणीवर मात करीत नाईक हे पोलीस दलात सहभागी झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत सी-६० दलात ते कार्यरत होते. नोकरी करतानाच अभ्यास करून परीक्षा दिली. त्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. त्यांचे हे यश जिल्ह्यातील इतर होतकरू युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: Naik became the first police sub-ins at Etapally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.