नगर पंचायतीच्या आरक्षणाची सोडत
By Admin | Updated: August 22, 2015 01:51 IST2015-08-22T01:51:45+5:302015-08-22T01:51:45+5:30
एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, कुरखेडा येथील नगर पंचायतीच्या आरक्षणाची प्रभागनिहाय सोडत शुक्रवारी ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आली.

नगर पंचायतीच्या आरक्षणाची सोडत
बालकांनी काढली सोडत : एटापल्ली, कुरखेडा, सिरोंचा, भामरागड नगर पंचायत
गडचिरोली : एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, कुरखेडा येथील नगर पंचायतीच्या आरक्षणाची प्रभागनिहाय सोडत शुक्रवारी ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आली.
एटापल्ली - नगर पंचायतीमधील प्रभाग क्रमांक १, २, १५ व १६ अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग क्रमांक ३, ५, ८ व १७ अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक ६ अनुसूचित जाती स्त्री, प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९, १० व १३ नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक ११ मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण स्त्री व प्रभाग क्रमांक १४ अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला आहे. यावेळी गडचिरोली उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवने, तहसीलदार संपत खलाटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
कुरखेडा - येथील नगर पंचायतीचा प्रभाग क्रमांक १ व ११ नामाप्र, प्रभाग क्रमांक २ व १७ सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ व १४ अनुसूचित जमाती महिला, प्रभाग ६ अनुसूचित जाती महिला, प्रभाग ७ अनुसूचित जाती, प्रभाग ८, ९, १०, १६ सर्वसाधारण, प्रभाग १२, १३ व १५ नामाप्र महिला, प्रभाग ४ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी एम. पी. टोनगावकर, तहसीलदार तोडसाम उपस्थित होते.
सिरोंचा - नगर पंचायतीतील ९ प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जातीसाठी प्रभाग १२, अनुसूचित जाती महिलेसाठी प्रभाग ११ व १३, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग ३, अनुसूचित जमाती महिलेसाठी प्रभाग ४, नामाप्रसाठी प्रभाग ९ व १५, नामाप्र महिलेसाठी प्रभाग ५, ६, १४, सर्वसाधारणसाठी ७, ८, १६ व १७ व सर्वसाधारण महिलेसाठी प्रभाग १, २ व १० आरक्षित ठेवण्यात आले आहे. यावेळी अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, सत्यनारायण पडार्लावार, रिक्कूलवार उपस्थित होते.
भामरागड - नगर पंचायतीतील प्रभाग क्रमांक ९ अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक १, ८, १२, १४, १५, अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक २, ४, ६, ७, १३, १७ अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक ३, ५, ११ नामाप्र महिला व प्रभाग क्रमांक १० व १६ नामाप्रसाठी आरक्षित आहे. यावेळी देसाईगंजचे एसडीओ नान्हे, भामरागडचे तहसीलदार उपस्थित होते.