सहा नगर पंचायतीत ३९ उमेदवारी अर्ज अवैध

By Admin | Updated: October 10, 2015 01:39 IST2015-10-10T01:39:35+5:302015-10-10T01:39:35+5:30

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सहा नगर पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज छाननीचे काम शुक्रवारी करण्यात आले.

In Nagar Panchayat, 39 candidates have to file their nomination | सहा नगर पंचायतीत ३९ उमेदवारी अर्ज अवैध

सहा नगर पंचायतीत ३९ उमेदवारी अर्ज अवैध


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सहा नगर पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज छाननीचे काम शुक्रवारी करण्यात आले. छाननीदरम्यान ३९ उमेदवारांचे नामांकन पत्र अवैध ठरले आहेत. सर्वाधिक १४ उमेदवारी अर्ज सिरोंचा येथे अवैध ठरले तर भामरागड येथे एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरला नाही.
चामोर्शी नगर पंचायतीच्या एकूण १६९ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते. छाननीच्या वेळी यातील १० उमेदवारांचे ११ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. आता नगर पंचायतीच्या केवळ १५८ नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिले आहेत. नामनिर्देशनपत्र अस्वीकृत झालेल्यांममध्ये प्रभाग क्रमांक १ मधील मनोहर चिन्नू तोरे, मसराम किशोर नामदेवराव, प्रभाग क्रमांक २ मधून छायाताई माणिकचंद कोहळे, प्रभाग क्रमांक ५ मधून सुधीर खोब्रागडे, प्रभाग क्रमांक ११ मधून डॉ. रामदास उडाण, दिलीप चलाख, प्रभाग १५ मधून शालू राजेश दुर्गे, प्रभाग १७ मधून देवानंद वासेकर, चंदन खरवडे, प्रभाग ६ मधून सुमेध माणिकराव तुरे यांचा समावेश आहे.
मुलचेरा नगर पंचायतीत एकूण ५६ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. त्यापैकी एकच नामनिर्देशनपत्र रद्द झाला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील सुनीता रमेश कुसनाके यांनी दोन उमेदवारी अर्ज केले होते. त्यामुळे त्यांचा एक अर्ज अस्विकृत ठरला.
अहेरी नगर पंचायतीत सर्वाधिक १७३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. त्यापैकी सहा अस्विकृत झाल्याने १६७ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत.
एटापल्ली नगर पंचायतीत १२६ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. त्यापैकी सात नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्याने नगर पंचायतीत ११९ नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिले आहेत. नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेल्यांमध्ये प्रभाग क्रमांक ६ मधून चांदेकर सुनीता मोहन, प्रभाग क्रमांक ७ मधून गंपावार रमेश पापय्या, प्रभाग क्रमांक ११ मधून जितेंद्र मनिराम चिचघरे, जितेंद्र दशरथ टिकले, प्रभाग क्रमांक १२ मधून पत्तीवार स्वाती पंकज, प्रभाग क्रमांक १४ मधून अजय सूर्यप्रकाश दहागावकर, चिपीये रामेश्वर उदय यांचा समावेश आहे.
भामरागड नगर पंचायतीत एकही नामनिर्देशनपत्र रद्द न झाल्याने संपूर्ण ९१ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. सिरोंचा नगर पंचायतीत एकूण १०९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. छाणनीदरम्यान १४ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. आता ९५ अर्ज शिल्लक राहिले आहेत.

Web Title: In Nagar Panchayat, 39 candidates have to file their nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.