नडीकुडा गावात २५० ड्रम दारू सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:39 IST2021-05-06T04:39:07+5:302021-05-06T04:39:07+5:30
सिरोंचा : तालुक्यातील वडीकुडा गावातील दारू गाळणाऱ्या १० जणांकडे आसरअल्ली ठाण्याच्या पोलीस पथकाने छापा मारून तब्बल २५० ड्रम दारू ...

नडीकुडा गावात २५० ड्रम दारू सडवा नष्ट
सिरोंचा : तालुक्यातील वडीकुडा गावातील दारू गाळणाऱ्या १० जणांकडे आसरअल्ली ठाण्याच्या पोलीस पथकाने छापा मारून तब्बल २५० ड्रम दारू सडवा पकडून तो नष्ट केल्याचा दावा केला आहे. या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू गाळली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस निरीक्षक मंदार परीव यांची चमू आणि तालुका मुक्तिपथ चमूच्या संयुक्त विद्यमाने दारूबंदी अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली. दारू गाळणाऱ्यांकडून जप्त केलेल्या त्या सडव्याची किंमत १५ लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जाते.
नडीकुडा हे गाव दारू व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील बहुतांश लोक या अवैध दारू व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यामुळे आसरअली ठाण्याचे पथक दि. ४ला या गावात मोहिमेवर असताना गावातील १० विक्रेत्यांचा घरी धाड टाकून शोध घेण्यात आला. यावेळी घराच्या बाजूचा सांदवाडीत आणि घरामागील खुल्या जागेत जमिनीत पुरलेले मोह, साखर व गुळाचा सडवा असलेले २५० ड्रम आढळले. तो सडवा नष्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर आरोपी मात्र फरार झाले. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. नडीकुडा या गावातील लोकांचा व्यवसाय रात्रभर दारू काढणे आणि पहाटेच्या आसपास परिसरातील २५ गावांना पुरवठा करणे हा आहे.