शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...

By संजय तिपाले | Updated: May 29, 2024 14:53 IST

आरोपीला पकडून खांबाला बांधले 

गडचिरोली : कोरची तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवरील बेतकाठी गाव खुनाच्या थरारक घटनेने हादरून गेले. २९ मेरोजी पहाटे ३ वाजता पतीने भरझोपेत पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. त्यानंतर निर्दयी पती रक्ताने माखलेली कुऱ्हाड हाती घेऊन गावभर फिरला. त्यास नंतर मोठ्या भावाने पकडून घरी खांबाला बांधले.

      अमरोतीन रोहिदास बंजार ( वय ३३ असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती रोहिदास बिरसिंग बंजार (३७) याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. बेतकाठी गावात राहणारे हे जोडपे मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवत होते. घरगुती कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत असत.

मंगळवारी रात्री नित्याप्रमाणे जेवण करून कुटुंब झोपी गेले. त्यानंतर पहाटे ३ वाजता पती रोहिदास याने पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर निर्दयी रोहिदास बंजार याने हाती कुऱ्हाड घेऊन बाजार चौकात गेला. रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत भल्या पहाटे फिरणाऱ्या रोहिदासने संपूर्ण गावात दहशत निर्माण केली. काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुवून घरामागे झुडुपात फेकून दिली. मोठ्याभावाने गावातील युवकांच्या मदतीने त्यास पकडून घरी खुर्चीत बसवले व खांबाला दोरीने बांधून ठेवले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. १०८ रुग्णवाहिकेतून मृत अमरोतीन हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रूग्णालयात पाठविला.

खुनाचे कारण अस्पष्ट कोरची पोलिसांनी रोहिदास बंजार यास ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.. मात्र, अद्याप खुनामागील कारण अस्पष्ट आहे. अधिक तपास सुरु असल्याचे कोरची ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी सांगितले.

मुलीच्या रडण्याच्या आवाजाने खुनाला वाचा     रोहिदासने पत्नीचा खून केला तेव्हा घरात त्यांच्या मुली झोपलेल्या होत्या. पहाटे आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळल्यानंतर आठ वर्षांची सर्वांत लहान मुलगी वैशाली ही हमसून हमसून रडू लागली. तिच्या आवाजाने रोहिदासचा मोठा भाऊ नोहरसिंग हा धावत आला.

चार बहिणी प्रेमाला पारख्या अमरोतीन व रोहिदास यांना चार मुली आहेत. आईची हत्या, वडील तुरुंगात गेल्याने या चार बहिणींचा आधार हरवला आहे. त्या आई - वडिलांच्या प्रेमाला पारख्या झाल्या आहेत. १५ वर्षांची माधुरी नववीत, १३ वर्षांची मनीषा सातवीत, ११ वर्षीय कौशल्या पाचवीत तर ८ वर्षांची वैशाली दुसरीत  शिक्षण घेते. या घटनेने चौघी बहिणी सैरभैर झाल्या असून हुंदके आणि आश्रूंनी वातावरण सुन्न झाले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार