शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गळा चिरून किराणा दुकानदाराची हत्या, कोरची तालुक्याती थरारक घटना

By दिगांबर जवादे | Updated: October 12, 2023 16:04 IST

दवंडी गावातील घटनेने खळबळ

गडचिरोली : कोरची तालुक्यापासून आठ किमी अंतरावर येत असलेल्या दवंडी गावातील एका किराणा दुकानदाराची पाच ते सहा अज्ञात इसमांनी घरात शिरून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची थरारक घटना बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. लखन सुन्हेर सोनार (वय ३८) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.

लखनची पत्नी सरिताने बयाणात दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर सोनार कुटुंब झोपी गेले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक दरवाजा ठोठाविण्यात आला. लखन यांची पत्नी सरिता हिने दरवाजा उघडला असता पाच ते सहाच्या संख्येत असलेले व काळे कपडे परिधान केलेले अज्ञात इसम घरात शिरले. सरिताने आरडाओरड करू नये म्हणून तिला चाकूचा धाक दाखविण्यात आला. त्यानंतर कोणताही विचार न करता लखनच्या मानेवर चाकूने वार करण्यात आले. 

लखन हा निपचीत पडला तरी हत्यारे त्याच्यावर चाकूचे वार करीतच होते. काही वेळातच खून करणारे पसार झाले. त्यानंतर सरिताने सभोवतालच्या लोकांना बोलावून घटनेची माहिती दिली. कोरची पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. लखनचे कोणाशीही वैर नव्हते. तसेच हत्या करणारे काळे कपडे घालून आले होते. चेहऱ्यावरही काळा रुमाल बांधूला होता. त्यामुळे त्यांना ओळखता आले नाही, अशी माहिती सरिता हिने बयाणात दिली. 

लखनच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान कोरची पोलिसांपुढे आहे. मृतक लखन सोनार यांच्या पश्चात पत्नी सरिता, १६ वर्षीय मुलगी पायल व १२ वर्षीय मुलगा प्रणय असे कुटुंब आहे. घटनेचा तपास बेडगाव पोलिस अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली