कलिंगड पोहोचताहेत मुंबईला
By Admin | Updated: February 23, 2017 01:35 IST2017-02-23T01:35:53+5:302017-02-23T01:35:53+5:30
कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आरमोरी तालुक्यातील शेतकरी आता प्रगतशील शेतीकडे वळले आहेत.

कलिंगड पोहोचताहेत मुंबईला
लागवड वाढली : नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांना फायदा
आरमोरी : कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आरमोरी तालुक्यातील शेतकरी आता प्रगतशील शेतीकडे वळले आहेत. तालुक्यातील शिवणी (बुज), वैरागड परिसरात १०० एकरवर शेतजमिनीत गेल्या दोन वर्षांपासून कलिंगडाची लागवड केली जात आहे. मोठ्या शहरातून मागणी वाढली असून आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरातील कलिंगड आता मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जात आहेत.
शिवणी (बुज.), वैरागड परिसरातील शेतजमिन सुपीक असून नदी, नाल्यांचा परिसर या भागाला लाभला आहे. हवामानही साजेसे असल्याने कलिंगड शेत लागवडीसाठी ते फायदेशिर आहे. पूर्वी केवळ बंगाली बांधवच कलिंगडाची लागवड करीत होते. मात्र आता धान उत्पादक शेतकरीही या शेतीकडे वळले आहेत.