श्रमदानातून विहिरीतील गाळ काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:28 IST2021-06-04T04:28:09+5:302021-06-04T04:28:09+5:30
चेरपल्ली येथील बेघर कॉलनीत रवी कांबळे यांच्या घरासमोरील सार्वजनिक विहीर, कोंडवाडाच्या बाजूला असलेली विहीर, जयंतराव कांबळे यांच्या घरासमोरील, मारोती ...

श्रमदानातून विहिरीतील गाळ काढला
चेरपल्ली येथील बेघर कॉलनीत रवी कांबळे यांच्या घरासमोरील सार्वजनिक विहीर, कोंडवाडाच्या बाजूला असलेली विहीर, जयंतराव कांबळे यांच्या घरासमोरील, मारोती रामटेके यांच्या घराजवळील, दिवाकर झाडे यांच्या घराजवळ तसेच सांगूवार घराजवळ अशा एकूण सात सार्वजनिक विहिरी आहेत. सार्वजनिक विहिरीतील कचरा व गाळ साफ करण्यात न आल्याने नागरिकांना दूषित पाणी पिऊन कसेबसे जीवन जगावे लागते आहे. नागरिकांना अजून किती दिवस दूषित पाणी पिऊन जीवन लागावे लागेल असा अनेक प्रश्न निर्माण होत आहे. विहिरीतील कचरा व गाळ लवकरात लवकर काढण्यात यावे, अशी मागणी राजू सूनतकर व रवी कांबळे यांनी मुख्याधिकारी अजय साळवे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
===Photopath===
030621\img-20210603-wa0106.jpg
===Caption===
ग्रामस्थांनी केली सार्वजनिक विहिरीतील गाळ साफ करताना गावकरी