महावितरणचा शाॅक, वर्षभरात ५ जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:09 IST2021-02-18T05:09:13+5:302021-02-18T05:09:13+5:30
जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील पाच नागरिकांना जीव गमवावा लागला. बाॅक्स तुटपुंजी मदत विजेचा धक्का ...

महावितरणचा शाॅक, वर्षभरात ५ जणांचा बळी
जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील पाच नागरिकांना जीव गमवावा लागला.
बाॅक्स
तुटपुंजी मदत
विजेचा धक्का लागल्याने मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना केवळ चार लाख रुपयांची मदत दिली जाते. यातील २० हजार रुपये तातडीने दिले जातात, तर उर्वरित ३ लाख ८० हजार रुपयांची रक्कम सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर जवळपास दाेन महिन्यांनी दिली जाते. जखमी व्यक्तीला त्याच्या दुखापतीवरील खर्चानुसार मदत दिली जाते. ही मदत उपचारावर हाेणाऱ्या खर्चापेक्षा कमी राहत असल्याने संबंधित व्यक्तीला घरचे पैसे खर्च करून उपचार करावे लागतात. त्यात वाढ हाेण्याची गरज आहे.
बाॅक्स
३५ पाळीव जनावरांचेही गेले प्राण
गडचिराेली जिल्ह्यात बहुतांश वीज तारा जंगलातून गेल्या आहेत. पावसाळ्यादरम्यान एखादे झाड वीज तारांवर काेसळते. यावेळी ट्रीप हाेऊन वीजपुरवठा बंद हाेणे अपेक्षित असते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा बंद न हाेता सुरूच राहतो. अशावेळी एखाद्या पाळीव प्राण्याचा या वीज तारांना स्पर्श हाेऊन त्या प्राण्याला जीव गमवावा लागतो. वर्षभरात ३५ पाळीव जनावरे ठार झाली आहेत. पाळीव जनावरांच्या मालकांना किमान तीन ते कमाल पाच हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाते.