खासदारांनी ऐकली गाऱ्हाणी
By Admin | Updated: April 8, 2016 01:20 IST2016-04-08T01:20:00+5:302016-04-08T01:20:00+5:30
गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी बुधवारी दत्तक ग्राम येवली येथे आयोजित महाराजस्व अभियानात ..

खासदारांनी ऐकली गाऱ्हाणी
येवलीत महाराजस्व अभियान : नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप
गडचिरोली : गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी बुधवारी दत्तक ग्राम येवली येथे आयोजित महाराजस्व अभियानात नागरिकांच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकून समस्यांचे निराकरण केले. दरम्यान शिबिरात नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटपही करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तहसीलदार डी. जी. भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, नंदू काबरा, सरपंच गीता सोनकर, शोभा कोठारे, शीला कन्नाके, रवीना रोहणकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, वैद्यकीय अधिकारी देवगडे, नायब तहसीलदार खारकर, चोखाजी बांबोळे, बँक व्यवस्थापक कोहपरे, रूमाजी भांडेकर, मंडळ अधिकारी प्रकाश डांगे उपस्थित होते.
शिबिरादरम्यान शासनाच्या विविध विभागाच्या वतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. तसेच विविध कागदपत्रांच्या सोयीसुविधेसाठी सेतू सुविधा केंद्रही निर्माण करण्यात आला. भोगवटदार वर्ग- २ जमिनीचे वर्ग- १ मध्ये रूपांतर करण्याची प्रकरणे सादर करण्यात आली. तसेच सातबारा, नमुना ८ अ, उत्पन्नाचे दाखले वितरित करण्यात आले. तर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भांडेकर तर आभार मीनाक्षी भुरसे यांनी मानले. तलाठी महेश गेडाम, निशांत भानारकर, राजू सिडाम, संजय लाडवे, रमेश खोब्रागडे, पांडू पेंदाम, रामचंद्र रायसिडाम, अरूण गेडाम यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)