खासदारांच्या हस्ते बाेदलीत धानखरेदीचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:36 IST2021-01-20T04:36:13+5:302021-01-20T04:36:13+5:30

गडचिराेली : मार्केटिंग फेडरेशन, गडचिरोलीअंतर्गत विकास सहकारी तांदूळ गिरणी मर्यादित, घोटच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील बोदली येथे नव्याने धान खरेदी ...

MP starts paddy procurement in Baidali | खासदारांच्या हस्ते बाेदलीत धानखरेदीचा प्रारंभ

खासदारांच्या हस्ते बाेदलीत धानखरेदीचा प्रारंभ

गडचिराेली : मार्केटिंग फेडरेशन, गडचिरोलीअंतर्गत विकास सहकारी तांदूळ गिरणी मर्यादित, घोटच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील बोदली येथे नव्याने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन १८ जानेवारी राेजी खासदार अशाेक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे उपस्थित हाेते. याप्रसंगी फीत कापून धान खरेदी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना नोंदणी व सातबारा संदर्भाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कागदपत्रांची पूर्तता करून सुरळीत धान विकण्याचे आवाहन खासदार अशाेक नेते यांनी केले. तसेच हमाली व दराबाबत व खरेदीबाबत सविस्तर माहिती सोसायटीच्या व्यवस्थापक संगीता उपटलावार यांनी दिली.

याप्रसंगी माजी सरपंच भगवंत चिलंगे, बाबूराव गेडाम, महागू पिपरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आशिष मोगरकर, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणपत पंदिलवार, देवेंद्र पिपरे, नितीन कुनघाडकर, वसंत दुधबावरे, वासुदेव भोवरे, गुरुदास वैरागडे, आदी उपस्थित हाेते.

Web Title: MP starts paddy procurement in Baidali