बियाणे व नुकसान भरपाईसाठी आंदोलन
By Admin | Updated: July 6, 2014 23:55 IST2014-07-06T23:55:23+5:302014-07-06T23:55:23+5:30
कुरखेड्या तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धानपिकाची पेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी काही ठिकाणचे पऱ्हे उगविली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

बियाणे व नुकसान भरपाईसाठी आंदोलन
शेतकरी हवालदिल : जिल्हाधिकाऱ्यांना घेराव
कुरखेडा : कुरखेड्या तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धानपिकाची पेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी काही ठिकाणचे पऱ्हे उगविली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, तसेच एकरी ५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी युवाशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातपिक घेतले जाते. धानपिकाच्या शेतीवरच जिल्ह्याची अर्थव्यवस्था अवंलबून आहे. सुरूवातीला दोेन दिवस पावसाने हजेरी लावली. पावसाळा सुरू झाल्याची चाहूल लागताच जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली. मात्र पावसाने महिनाभरापासून उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील बियाणे उगविलीच नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करून आधार द्यावा, याकरीता १० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व युवाशक्ती संघटनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जि.प.च्या बांधकाम सभापती छाया कुंभारे, विलास ठोंबरे, संतोष मारगोनवार, सज्जो करपुरकेला, डॉ. महेंद्र मोहबंशी, निराजंनी चंदेल आदी करणार आहेत. (शहर प्रतिनिधी)