आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:34 IST2019-09-17T00:34:07+5:302019-09-17T00:34:49+5:30
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव रजनी गेडाम आदींनी केले. या आंदोलनात कविता दरवडे, संगीता मेश्राम, विद्यादेवी येजुलवार, गीता सातघरे, ज्योत्स्ना रामटेके, आशा नवघरे, चंदा लोखंडे, माधुरी कोरटला, संजू सहारे, जयमाला सोरते, किरण गजभिये आदीसह शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होत्या. जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधनवाढीचा जीआर काढण्यात यावा, सेवेत कायम करण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. महिलांनी सरकारविरोधात नारेबाजी केली.