चामोर्शीत ग्रामसेवकांचे आंदोलन
By Admin | Updated: April 6, 2016 01:34 IST2016-04-06T01:34:09+5:302016-04-06T01:34:09+5:30
कोरची तालुक्यातील ग्रामसेवक सुधीर वसाके यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,

चामोर्शीत ग्रामसेवकांचे आंदोलन
बीडीओला निवेदन : सुधीर वसाके मृत्यू प्रकरण
चामोर्शी : कोरची तालुक्यातील ग्रामसेवक सुधीर वसाके यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी चामोर्शी तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समितीसमोर मंगळवारी धरणे आंदोलन करून संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, सचिव प्रदीप भांडेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र ऐलावार, उपाध्यक्ष वसंत पवार, कोषाध्यक्ष चेतन वंजारी, सचिव इंद्रावन बारसागडे, ग्रामसेवक मधुकर कुकडे, प्रकाश पिपरे, गीता परचाके, गायत्री वासेकर, मेश्राम, सहारे, कोडापे, बावनकर यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते. ५ एप्रिल रोजी पंचायत समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे सभेचे कामकाज होऊ शकले नाही. वसाके यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात न आल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)