शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

मोस्ट वाँटेड नक्षल हस्तकास जंगलात ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 23:07 IST

पेरिमिली येथे सी- ६० पथकाची कारवाई: शासनाने ठेवले होते दीड लाखांचे बक्षीस

संजय तिपाले /गडचिरोली : जवानांवर हल्ला करणे, जाळपोळ करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अशा गंभीर स्वरुपांच्या विविध गुन्ह्यांत मोस्ट वाँटेड असलेल्या माओवाद्यांच्या हस्तकास १ जूनला सी- ६० पथकाने जेरबंद केले. भामरागड तालुक्यातील पेरिमिली जंगलात ही कारवाई करण्यात आली. त्याच्या डोक्यावर शासनाचे दीड लाखांचे बक्षीस होते.

 सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा (वय २३, रा. तोयामेट्टा, ता ओरच्छा, जि. नारायणपूर , छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे.   अहेरी उपविभागांतर्गत  पेरिमिली उपपोलिस ठाणे हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित होते. तेव्हा तो संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. तो कट्टर माओवादी समर्थक असून २०२० पासून माओवाद्यांसाठी काम करायचा. माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना बैठकीसाठी जबरदस्तीने एकत्रित आणणे,   पोलिसांविरुध्द कट रचणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे  करीत होता. पोलिस अधीक्षक  नीलोत्पल ,   अपर अधीक्षक (अभियान)   यतीश देशमुख  ,  कुमार चिंता ,  एम. रमेश , उपअधीक्षक (अभियान)  विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. ....

एक खून, तीन चकमकीसह स्फोटाचेही गुन्हेसोमा तिम्मावर एकूण सात गुन्हे नोंद आहेत. छत्तीसगडच्या कुतुल (जि. नारायणपूर) येथील  आगुळी वडदा या निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२०- २१ मध्ये कुतुल (जि. नारायणपूर) जंगल परिसरातील सोनपूर  येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतही तो सामील होता. २०२१ मध्ये दुरवडा जि. नारायणपूर  जंगलात तसेच २०२२ मध्ये मोहंदी जि. नारायणपूर  गावाजवळील जंगल परिसरात हाकीबोडा पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.  याशिवाय  कोकामेटा   गावातील पुलावर स्फोट घडविला होता. यात चार जवान शहीद झाले होेते. मोहंदी तसेच कुतुल   रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवल्याचा गुन्हाही त्याने केला होता.  

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली