शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश शाळांत नेट कनेक्टीव्हिटी नाही

By admin | Updated: September 16, 2014 23:42 IST

राज्य शासनाने जिल्हा परिषद, खासगी अनुदानित तसेच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया मे महिन्यापासून

कव्हरेज गूल : लिपिक, शिक्षकांची जिल्हा मुख्यालयी धावगडचिरोली : राज्य शासनाने जिल्हा परिषद, खासगी अनुदानित तसेच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया मे महिन्यापासून सुरू केली. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शासकीय आश्रमशाळा, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देयके सादर करण्यासाठी लिपिक व शिक्षकांना जिल्हा तसेच तालुका मुख्यालयी धाव घ्यावी लागत आहे. राज्य शासनाने ‘ई-प्रशासन, सुप्रशासन’ ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कार्यालयातील अनेक दस्तावेज आॅनलाईन करण्यात आले आहे. मात्र गडचिरोलीसारख्या दुर्गम नक्षल प्रभावित जिल्ह्यात पूर्णपणे नेट कनेक्टिव्हिटीची सुविधा निर्माण करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. सध्य:स्थितीत शेकडो ग्रामपंचायतीमध्येही नेट कनेक्टिव्हिटी नसल्याची माहिती आहे. संबंधीत गावातील ग्रामसेवकाला आॅनलाईन कामासाठी वारंवार जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत. शासनाने मे महिन्यापासून शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन प्रक्रियेद्वारे करण्यास सुरूवात केली आहे. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीत प्रत्येक गावात तसेच शाळांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी करण्यात आली नाही. यामुळे आॅनलाईन कामे करताना ग्रामीण व दुर्गम भागात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत.आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पात २४ शासकीय तसेच १९ खासगी अनुदानित अशा एकूण ४२ आश्रमशाळा आहेत. मात्र यापैकी एकाही आश्रमशाळेमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. याशिवाय गॅरापत्ती, कोटगुल, सावरगाव, गोडलवाही, पेंढरी या आश्रमशाळांमध्ये बीएसएनएल सेवेचे कव्हरेज राहत नाही. आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देयके आॅनलाईन सादर करता यावे, यासाठी गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्यावतीने काही दिवसांपूर्वी प्रकल्पातील सर्वच आश्रमशाळा व वसतिगृहांना थ्रीजी सेवेचे नेटसेटर पुरविण्यात आले आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील गावांमध्ये बीएसएनएलचे कव्हरेज राहत नसल्याने पुरविण्यात आलेले थ्रीजी सेवेचे नेटसेटरही सध्या निकामी ठरले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)