चामोर्शी तालुक्याला सर्वाधिक निधी
By Admin | Updated: January 12, 2016 01:26 IST2016-01-12T01:26:52+5:302016-01-12T01:26:52+5:30
१४ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त जनरल बेसिक ग्रॅन्डच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पंचायत समिती निहाय ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे.

चामोर्शी तालुक्याला सर्वाधिक निधी
१४ वा वित्त आयोग : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींना १५ कोटी २१ लाख १५ हजारांचे वाटप
गडचिरोली/आरमोरी : १४ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त जनरल बेसिक ग्रॅन्डच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पंचायत समिती निहाय ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे. या आधारे चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ७५ तर त्या खालोखाल धानोरा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींना १५ कोटी २१ लाख १५ हजार रूपयांचा निधी वितरित झाला आहे.
अहेरी तालुक्यात ३९ ग्रामपंचायती असून ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार १ कोटी ७१ लाख १९ हजार ११८ रूपये निधी देण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींना १ कोटी २४ लाख ५३ हजार ८५५ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. भामरागड तालुक्यात १९ ग्रामपंचायतींना ५७ लाख १७ हजार १०७ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. चामोर्शी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींना २ कोटी ६२ लाख ३७ हजार १०७ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींना ८८ लाख १० हजार १३३ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. धानोरा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींना १ कोटी ४१ लाख ३८ हजार ८२६ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. एटापल्ली तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींना १ कोटी ४५ लाख ५ हजार ७५९ रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींना १ कोटी ४९ लाख ३५ हजार १३० रूपयांचा निधी देण्यात आला आहे. कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींना ७१ लाख ८६ हजार १७१ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. कुरखेडा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींना १ कोटी ३३ लाख २३ हजार १९९ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. मुलचेरा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना ७१ लाख ५० हजार ७३६ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५ लाख ३७ हजार ८५९ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. बाराही तालुक्यात ४५६ ग्रामपंचायती असून ८ लाख ८२ हजार ७९२ लोकसंख्येला १५ कोटी २१ लाख १५ हजार रूपयांचा निधी १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत वितरित करण्यात आला आहे. (वार्ताहर)