एसटी कर्मचाऱ्याकडून मोबाईलचा सर्रास वापर

By Admin | Updated: September 9, 2015 01:25 IST2015-09-09T01:25:03+5:302015-09-09T01:25:03+5:30

एसटीचे वाहक व चालक यांना राज्य परिवहन महामंडळाने कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी आणली असली तरी ...

The most common use of mobile phones by ST employees | एसटी कर्मचाऱ्याकडून मोबाईलचा सर्रास वापर

एसटी कर्मचाऱ्याकडून मोबाईलचा सर्रास वापर

चामोर्शी ते गडचिरोलीदरम्यानचा प्रवास : बंदी असतानाही वाहक व चालकाकडून नियमांची पायमल्ली
प्रतीक मुधोळकर गडचिरोली
एसटीचे वाहक व चालक यांना राज्य परिवहन महामंडळाने कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी आणली असली तरी गडचिरोली जिल्ह्यातील दोन्ही आगारांमधील चालक व वाहक खुलेआम मोबाईलचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. लोकमतने मंगळवारी चामोर्शी ते गडचिरोली या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करून याबाबतचे स्टिंग आॅपरेशन केले. त्यात हा प्रकार उघडकीस आला.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे दोन एसटी आगार आहेत. या आगाराच्या माध्यमातून जिल्हाभरात तसेच जिल्ह्याबाहेर व आंतरराज्यीय प्रवासी वाहतूक केली जाते. साधारणत: २०० च्या आसपास बसगाड्या रोज दोन्ही आगारातून आवागमन करतात. यावर सेवारत असलेल्या चालक वाहकांना मोबाईल वापरण्यावर बंदी करण्यात आली होती. मात्र आता राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सर्रासपणे चालू बसगाडीत मोबाईलचा वापर करीत आहे, असे दिसून येत आहे. चामोर्शी ते गडचिरोली प्रवासादरम्यान ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे.
का घालण्यात आली होती चालक वाहकावर मोबाईल वापरण्यास बंदी
राज्यात काही ठिकाणी चालक बस चालवीत असताना मोबाईलवर बोलत असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अपघात होण्याची शक्यता वाढली होती. या कारणामुळे बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच वाहकाकडे मोबाईल असल्याने एखाद्या मार्गावर तपासणी पथक आल्यानंतर त्याबाबतची माहिती तत्काळ इतर वाहकांना दिली जात होती. त्यामुळे वाहक सतर्क होत होते. त्या मार्गावर त्या दिवशी प्रत्येकाची तिकीट काढली जात होती. अन्यथा अनेक वाहक प्रवाशांकडून परस्पर पैसे घेऊन मोकळे होत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने कर्तव्यावर असताना वाहक व चालकाला मोबाईल बाळगण्यावर बंदी घातली होती.

Web Title: The most common use of mobile phones by ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.