शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

५५६ गावांमध्ये होणार डासनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

डास नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती असणारी स्थाने नष्ट करणे, नाल्या वाहत्या करणे, टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावणे आदी उपक्रमांमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन स्वच्छता मोहीम राबविली जाणार होती. परंतू या कामांनी अद्याप वेग घेतलेला नाही. आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्र कर्मचाऱ्यांमार्फत डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रमही अद्याप अनेक ठिकाणी राबविलेला नाही.

ठळक मुद्दे२६ जूनपासून सुरूवात : जिल्ह्यातील चार लाखांवर नागरिकांना मिळणार कीटकनाशकभारीत मच्छरदाण्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक प्रमाणात कीटकजन्य आजाराचे प्रमाण असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी ५५६ गावांमध्ये डासनाशकाची फवारणी केली जाणार आहे. दरवर्षी जवळपास १५०० गावांमध्ये ही फवारणी होत असते. यावर्षी मात्र निधीच्या कमतरतेमुळे डासजन्य आजारांचे प्रमाण जास्त असणाºया ५५६ गावांचीच फवारणीसाठी निवड करण्यात आली आहे. असे असले तरी यावर्षी अनेक गावांना मच्छरदाण्यांचे वाटप होणार आहे.आरोग्य सेवा संचालनाच्या वतीने दरवर्षी जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळला जातो. त्यानुसार यावर्षीही ३ जूनपासून ते ३० जूनपर्यंत ‘एक दिवस एक कार्यक्रम’ याप्रमाणे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. कीटकजन्य आजाराबाबत सर्व्हेक्षण, फवारणी, डासोत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, मच्छरदान्यांचा वापर, डासांपासून स्वत:चे रक्षण कसे करावे याबाबतची माहिती पुरवणे, कीटकजन्य आजाराविषयी प्रचार साहित्य जनतेपर्यंत पोहोचविणे अशा विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे.या कामांची अंमलबजावणी करताना प्रत्येक गाव, प्रभाग पातळीवर ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला मंडळे यांचा सहभाग घेऊन जनजागृती केली जाणार आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येक गावात आरोग्य कर्मचारी (पुरूष व स्त्री) तसेच आरोग्य सहायक यांच्या माध्यमातून जलद ताप रुग्णांचे सर्व्हेक्षणही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतू या सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले आहेत.दि.२६ पासून पुढील २० दिवस ५५६ गावांमध्ये २२२ हंगामी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डासनाशकाची फवारणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ६ लोकांची एक टीम अशा ३७ टीम बनविण्यात आल्या आहेत. जून-जुलैमधील पहिल्या फवारणीनंतर दुसरी फवारणी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात केली जाणार आहे.स्वच्छता मोहिमेची गती वाढविण्याची गरजडास नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती असणारी स्थाने नष्ट करणे, नाल्या वाहत्या करणे, टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावणे आदी उपक्रमांमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन स्वच्छता मोहीम राबविली जाणार होती. परंतू या कामांनी अद्याप वेग घेतलेला नाही. आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्र कर्मचाऱ्यांमार्फत डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रमही अद्याप अनेक ठिकाणी राबविलेला नाही. त्याला गती देण्याची गरज आहे. गडचिरोली शहरातील अनेक भागात आणि ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत.हिवताप प्रतिरोध महिन्याचे नियोजन बिघडलेयावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिवताप प्रतिरोध महिन्यातील विविध कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांना अद्याप सुरूवात झालेली नाही. यावर्षी निधीही पुरेसा नसल्यामुळे अनेक ठिकाणी काटकसर केली जात आहे.यावर्षी देणार सर्वाधिक मच्छरदाण्याआरोग्य विभागाकडून यावर्षी गडचिरोली जिल्ह्याला ४ लाख ६९५ मच्छरदाण्या मिळणार आहेत. त्या १३७७ गावांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. मात्र एवढ्या मच्छरदाण्या कुठे ठेवायच्या, अशा प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पाच ठिकाणी त्यांचा साठा करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तीन वेगवेगळ्या आकाराच्या या मच्छरदाण्यांमध्ये मोठ्या आकाराच्या मच्छरदाण्या सर्वाधिक राहणार आहेत. अद्याप त्या मच्छरदाण्या मिळालेल्या नाही, मात्र लवकरच त्या मिळतील आणि पुढील महिन्यात त्याचे वाटपही सुरू होईल, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य