सीआरपीएफतर्फे मच्छरदाणी वाटप
By Admin | Updated: January 9, 2017 00:55 IST2017-01-09T00:55:33+5:302017-01-09T00:55:33+5:30
आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना डासांपासून संरक्षण करता यावे, ..

सीआरपीएफतर्फे मच्छरदाणी वाटप
जपतलाईत कार्यक्रम : ११३ बटालीयनचा पुढाकार
धानोरा : आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना डासांपासून संरक्षण करता यावे, त्यांना संसर्गजन्य आजार उद्भवू नयेत या हेतूने सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने जपतलाई येथे मच्छरदाणींचे वाटप करण्यात आले.
बटालीयनचे कमांडंट एम. शिवशंकरा, द्वितीय कमान अधिकारी के. डी. जोशी व जे. पी. सॅम्युअल यांच्या निर्देशानुसार मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. यावेळी बटालीयनचे निरीक्षक धर्मवीरसिंह, उपनिरीक्षक चंदू दहाटे, येरकड पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नितेश देशमुख, जपतलाईचे सरपंच तसेच नागरिक उपस्थित होते. दुर्गम गावातील नागरिकांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन धर्मवीरसिंह यांनी केले तर दुर्गम व आदिवासी बहूल भागातील नागरिकांनी आपल्या अडीअडचणी प्रशासनापुढे मांडाव्या, पोलीस प्रशासन त्यांना नेहमी सहकार्य करेल, असे प्रतिपादन येरकड पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नितेश देशमुख यांनी केले.
सीआरपीएफच्या वतीने नागरिकांना मच्छरदाणींचे वाटप केल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)