निम्म्याहून अधिक मजूर मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:56+5:302021-05-08T04:38:56+5:30
गडचिराेली : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नाेंदणी केलेल्या बांधकाम मजुरांना काेराेना लाॅकडाऊनमुळे प्रत्येकी दीड हजार ...

निम्म्याहून अधिक मजूर मदतीपासून वंचित
गडचिराेली : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नाेंदणी केलेल्या बांधकाम मजुरांना काेराेना लाॅकडाऊनमुळे प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले हाेते. परंतु गडचिराेली जिल्ह्यात माेजक्याच बांधकाम मजुरांना आतापर्यंत मदत मिळाली आहे. निम्म्याहून अधिक मजूर मदतीपासून वंचित आहेत.
गडचिराेली जिल्ह्यातील १६ हजारांवर मजुरांनी ऑनलाइन नाेंदणी केली आहे. विशेष म्हणजे, अनेक मजुरांनी ऑनलाइन नाेंदणी केली आहे. परंतु त्यांना अद्यापही कार्डचे वाटप कामगार कार्यालयाकडून करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक बांधकाम कामगार कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु त्यांना काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका असल्याचे कारण देत परत पाठविले जात आहे. विशेष म्हणजे, पाच ते सहा महिन्यांपूर्वी सदर मजुरांनी ऑनलाइन नाेंदणी केली हाेती. परंतु त्यांना कार्ड न मिळाल्याने त्यांची रीतसर नाेंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. परिणामी कार्ड न मिळालेले अनेक मजूर दीड हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित आहेत. याशिवाय गडचिराेली जिल्हा कामगार कार्यालयात अत्यल्प कर्मचारी व रिक्त पदे असल्याने काम प्रभावित हाेत आहे.
बाॅक्स .
मदत मिळणार कधी?
कामगार मंडळातर्फे अनेक मजुरांना दीड हजार रुपयांची मदत अनुदान स्वरूपात मिळाली आहे. परंतु आपल्याला सदर मदत अद्यापही मिळाली नाही. गावातील अनेक बांधकाम मजूर मदतीपासून वंचित आहेत. राेजगार ठप्प असल्याने मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- भैयाजी चाैधरी
काेट...
कामगार कल्याणकारी मंडळातर्फे मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या मदतीबाबत आपल्याला फारशी माहिती नाही. परंतु अशा प्रकारची कुठलीही मदत मला मिळाली नाही. शासनाकडून दीड हजार रुपये अद्यापही मिळाले नसल्याने सदर मदतीची प्रतीक्षा आपल्याला आहे.
- लाेमेश भाेयर
काेट ........
आपल्या गावातील अनेक मजुरांना शासनाकडून दीड हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. परंतु माझ्या बँक खात्यात अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे मला मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने पुन्हा दुसऱ्या महिन्यातसुद्धा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करून बांधकाम मजुरांचे जीवनमान सुधारावे.
- जीवन मडावी
बाॅक्स ......
रिक्त पदांमुळे कामगार कार्यालय रामभराेसे
जिल्हा कामगार कार्यालयात केवळ जिल्हा कामगार अधिकारी नियमित आहेत. उर्वरित सर्व कर्मचारी राेजंदारी तत्त्वावरील आहेत. नियमित असलेली पदे रिक्त आहेत. सध्या जिल्हा कामगार अधिकारी सुट्यांवर असल्याने चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांकडे प्रभार आहे. परंतु त्यांचेही कार्यालयावर नियंत्रण नाही. सध्या हे कार्यालय रामभराेसे असल्याचे दिसून येते.