देशाच्या बॉर्डरपेक्षा रस्त्यावर अधिक धोका

By Admin | Updated: January 25, 2016 02:04 IST2016-01-25T02:04:38+5:302016-01-25T02:04:38+5:30

देशाच्या सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांच्या तुलनेत रस्त्यावर अपघाताने मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या

More danger on the road than the country's border | देशाच्या बॉर्डरपेक्षा रस्त्यावर अधिक धोका

देशाच्या बॉर्डरपेक्षा रस्त्यावर अधिक धोका

गडचिरोली : देशाच्या सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांच्या तुलनेत रस्त्यावर अपघाताने मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या कित्येक पटीने अधिक आहे. त्यामुळे भारतामध्ये बॉर्डरपेक्षा रस्ते धोकादायक ठरले आहेत, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली व शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या सुरक्षा अभियानाचा समारोप २४ जानेवारी रोजी करण्यात आला. याप्रसंगी इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात आयोजित कार्यक्रमादरम्यान मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामराव कुंभार, प्रमुख अतिथी म्हणून आलापल्ली आयटीआयचे प्राचार्य सुरेश डोंगे, गोंडवाना सैनिक विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर, राजीव रासेकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, गडचिरोली ठाण्याचे ठाणेदार विजय पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना डॉ. सागर कवडे यांनी अमेरिकेमध्ये वाहन परवाना मिळविण्यासाठी ३२ परीक्षा द्याव्या लागतात. तेथील वाहनांना भारतीय वाहनांच्या तुलनेत अधिक फिचर आहेत. त्यामुळे अपघातावर नियंत्रण मिळविता येते. मनावर ताण असताना किंवा दारू पिऊन कधीच वाहन चालवू नये, असे आवाहन केले. प्रास्ताविकादरमयान एआरटीओ फासे यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम अविरतपणे राबविला जाईल. हर्षल बदखल यांच्याकडे नोंदणी केल्यास प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी संबंधित शिक्षण संस्थेमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन दिले. संचालन मोटारवाहन निरिक्षक एन. जी. बन्सोडे तर आभार बांबोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरिक्षक नितीन सूर्यवंशी, हर्षल बदखल, शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी अमृता राजपूत यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
४निबंध स्पर्धेत गट अ मध्ये प्रथम क्रमांक रोहित टेंभुर्णे, द्वितीय पार्थ हर्षल बदखल, तृतीय धम्मपाल रेवय्या कावरे, गट ब मध्ये प्रथम दानिशखान पठाण, द्वितीय प्रबोधी व्ही. वेस्कडे, तृतीय डेनीस स. उईके, प्रोत्साहन निशांत पी. बुल्ले, गट क मध्ये प्रथम भाग्यश राऊत, द्वितीय श्रमिका राऊत, तृतीय रोहिणी भोयर, प्रोत्साहन निखिल भोयर, चित्रकलामध्ये गट अ मध्ये दीक्षा जंगावार, कुणाल परसोडे, प्रियांशू चिलगेलवार, समीर इलेवार, गट ब मध्ये मनीष गजानन फापनवाडे, प्रज्वल उमाकांत तलांडे, नितांज महादेव नरोटे, प्रबोधी व्ही. वेस्कडे, गट क मध्ये भाग्यश राऊत, ऐश्वर्या कन्नाके, शर्मिक राऊत व पूनम मडावी यांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.
४अपघातविरहित सेवा दिल्याबद्दल एसटीचे चालक डी. जी. सहारे, फारूख हुसैन सिध्दीकी, सी. आर. ढवळे, बी. बी. वाकुडकर, ए. आर. चुघ, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोलीचे किशोर गडपल्लीवार, जानकीराम लोणगाडगे, धनराज झाडे, मारोती इष्टाम यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: More danger on the road than the country's border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.