साळवेंवर आणखी गुन्हे दाखल
By Admin | Updated: February 22, 2017 02:06 IST2017-02-22T02:06:10+5:302017-02-22T02:06:10+5:30
चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांच्या विरूद्ध आणखी ३ विद्यार्थिनींनी सोमवारी

साळवेंवर आणखी गुन्हे दाखल
गडचिरोली : चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांच्या विरूद्ध आणखी ३ विद्यार्थिनींनी सोमवारी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून त्यांच्यावर फसवणूक, अॅट्रासिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. प्रमोद साळवे यांच्यावर त्यांच्या कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीवरून १७ फेब्रुवारी रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर १९ फेब्रुवारी रोजी आणखी काही मुलींनी जातिवाचक शिवीगाळ केल्याची व गैरवर्तणूकीबाबत तक्रार केली. पोलीस अधीक्षकांकडेही ही तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात डॉ. प्रमोद साळवे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमवारी २० फेब्रुवारी रोजी आणखी ३ विद्यार्थिनींनी गडचिरोली पोलीस ठाण्यात डॉ. साळवे यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ४२०, २९४, ३५४ (अ), ५०६, ५०९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व चातगाव पोलीस करणार आहेत. (प्रतिनिधी)