भामरागडवासीय काढू शकणार एटीएममधून पैसे
By Admin | Updated: July 24, 2016 01:36 IST2016-07-24T01:36:50+5:302016-07-24T01:36:50+5:30
महाराष्ट्राचा सर्वात दुर्गम तालुका अशी ज्याची ओळख आहे व ज्या भागात बँकिंग आर्थिक साक्षरतेचे प्रमाण नसल्याच्याच बरोबरीत आहे.

भामरागडवासीय काढू शकणार एटीएममधून पैसे
लोक बिरादरीत सुरुवात : प्रकाश व दिगंत आमटे यांच्या हस्ते शुभारंभ
भामरागड : महाराष्ट्राचा सर्वात दुर्गम तालुका अशी ज्याची ओळख आहे व ज्या भागात बँकिंग आर्थिक साक्षरतेचे प्रमाण नसल्याच्याच बरोबरीत आहे. अशा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आता खातेदार एटीएममशीनद्वारे आर्थिक व्यवहार करू शकतील.
हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या परिसरात बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने एटीएम केंद्र सुरू करण्यात आले. या एटीएम केंद्राचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे आदी उपस्थित होत्या. भामरागड परिसरात हेमलकसा गावात लोक बिरादरी प्रकल्पात दररोज शेकडो नागरिक येतात. ही बाब लक्षात घेऊन ही सेवा या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)