विनयभंग करणारा संस्थाचालक गजाआड
By Admin | Updated: November 23, 2014 23:19 IST2014-11-23T23:19:07+5:302014-11-23T23:19:07+5:30
येथील सोनिया नर्सिंग स्कूलच्या संस्थापकाला युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

विनयभंग करणारा संस्थाचालक गजाआड
चामोर्शीतील घटना : जीवे मारण्याची दिली धमकी
चामोर्शी : येथील सोनिया नर्सिंग स्कूलच्या संस्थापकाला युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
भीमराव शिवराम गोवर्धन (५३) रा. चामोर्शी असे अटक झालेल्या संस्थाचालकाचे नाव आहे. चामोर्शी येथील सोनिया नर्सिंग स्कूलमध्येच प्रशिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षीय आष्टी येथील युवतीचा भीमराव गोवर्धन याने विनयभंग केला. याबाबतची कुठेही वाच्च्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडित युवतीने २२ नोव्हेंबर रोजी चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार चामोर्शी पोलिसांनी संस्थाचालक भीमराव गोवर्धन याच्याविरोधात कलम ३५४ (१) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. २०१२ पासून सदर युवती सोनिया नर्सिंग स्कूलमध्ये चामोर्शी येथे शिकत होती. तेव्हापासून संस्थाचालक भीमराव गोवर्धन या मुलीला वारंवार त्रास देत होता, अशी माहिती सदर तक्रारकर्त्या मुलीने पोलिसांना दिली.
घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुजूमदार, पोलीस हवालदार वासुदेव अलाणे, पोलीस हवालदार साळवे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)