मोहाचे लाडू पोहोचणार दंतेवाडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:27 IST2017-11-13T23:26:33+5:302017-11-13T23:27:01+5:30
मोहफुलापासून तयार केलेले लाडू छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथील प्रदर्शनात विक्री व नमुने म्हणून ठेवले जाणार आहेत.

मोहाचे लाडू पोहोचणार दंतेवाडात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोहफुलापासून तयार केलेले लाडू छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथील प्रदर्शनात विक्री व नमुने म्हणून ठेवले जाणार आहेत. १४ नोव्हेंबरला होणाºया या प्रदर्शनात माविम अंतर्गत त्रिवेणीसंगम लोकसंचालित साधन केंद्र भामरागड मधील महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाकरिता महिला सोमवारी रवाना झाल्या.
एन.आय.टी.आर. आयोग भारत सरकार तथा छत्तीसगड शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आदिवासी लोकांकरिता ग्लोबल समीट तथा ट्रायबल एन्टरप्रिर्नशिप समीट दंतेवाडा येथे होणार आहे. प्रदर्शनी तथा समीट शिखर बैठकीमध्ये सहभागी होण्याकरिता प्रवीण काळबांधे, माविम प्रतिनीधी शांती गायकवाड, प लोक बिरादरी प्रकल्पाच्या प्रतिनिधी सुशीला मडावी व अन्य दोन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बैठकीला जाणाºया वाहनाला माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.