कुकडीच्या मोहा लाडूंनी घातली मुंबईच्या अधिकाऱ्यांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:07+5:302021-07-17T04:28:07+5:30

महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोलीद्वारा संचालित जीवन ज्योती लोकसंचालित साधन केंद्र वैरागडच्या पुढाकाराने जीवनज्योती संमिश्र वनधन विकास केंद्र वैरागडच्या ...

Moha Laddu of Kukdi seduced the Mumbai authorities | कुकडीच्या मोहा लाडूंनी घातली मुंबईच्या अधिकाऱ्यांना भुरळ

कुकडीच्या मोहा लाडूंनी घातली मुंबईच्या अधिकाऱ्यांना भुरळ

महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोलीद्वारा संचालित जीवन ज्योती लोकसंचालित साधन केंद्र वैरागडच्या पुढाकाराने जीवनज्योती संमिश्र वनधन विकास केंद्र वैरागडच्या कार्यालयात वनधन विकास केंद्राबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यासाठी ट्रायफेड मुख्यालय मुंबईचे क्षेत्रीय व्यवस्थापक मयूर गुप्ता, वरिष्ठ व्यवस्थापक एम.के. पांडे, नाशिकचे कार्यक्रम समन्वयक अतुल पाटील आदी अधिकारी आले होते.

कुकडी येथे माविम आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोहा लाडू व त्यावरील प्रक्रिया उद्योगाला अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यांनी मोहा फुलापासून तयार केलेले खाद्यपदार्थ लाडू, शेव, बालूशाही, चकली, शंकरपाळे, सॅनिटायझर इत्यादी वस्तूंची पाहणी करून त्या खरेदी केल्या, तसेच दीपज्योती धानोराच्या रसिका मारगाये यांनी या बैठकीला उपस्थित राहून महिलांना वनधन विकास केंद्राविषयी माहिती दिली.

चालू आर्थिक वर्षात ट्रायफेडकडून वनधन विकास केंद्राला मिळालेल्या ८ लक्ष रुपयांचे पुढील नियोजन कसे करायचे, याबाबत सी.एम.आर.सी.च्या अध्यक्ष संगीता मेश्राम आणि वनधन विकास केंद्राच्या अध्यक्ष शीतल गेडाम आणि सदस्यांनी चर्चा केली. कोणत्या वस्तू, प्रशिक्षण आणि मशिनरी पाहिजे आहे त्याची मांडणी केली.

बैठकीचे संचालन सहयोगिनी विशाखा सोनटक्के यांनी केले, तर प्रास्ताविक सीएमआरसीच्या व्यवस्थापक यामिनी मातेरे यांनी केले. आभार सुरेश बावनकर यांनी मानले. या बैठकीला मेंढा येथील वनधन गटाच्या अध्यक्ष मनीषा बावणे, कुरवंडीमाल येथील चेतना सराते, नागरवाही येथील संगीता हुरे उपस्थित होत्या.

(बॉक्स)

विविध मुद्यांवर चर्चा आणि मार्गदर्शन

बैठकीत जंगलातून संकलन केलेल्या मालाची साठवणूक करून त्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मार्केटिंग कसे करायचे आणि संकलन करताना घ्यावयाची काळजी, साठवणूक करताना येणाऱ्या जागेचा प्रश्न, मालावर प्रक्रिया करताना मशिनरी, तयार झालेल्या मालाला योग्य भाव आणि बाजारपेठेची उपलब्धता इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला.

160721\1723-img-20210716-wa0037.jpg

आढावा बैठकीचा फोटो

Web Title: Moha Laddu of Kukdi seduced the Mumbai authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.