शेतकऱ्यांना दिले आधुनिक शेतीचे धडे
By Admin | Updated: December 23, 2014 23:04 IST2014-12-23T23:04:52+5:302014-12-23T23:04:52+5:30
औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मसाला विकास निर्देशालय कालिकत, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे

शेतकऱ्यांना दिले आधुनिक शेतीचे धडे
गडचिरोली : औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मसाला विकास निर्देशालय कालिकत, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासोबतच मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबतुला यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. पी. लांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायोगी अधिष्ठाता डॉ. पी. आर. कडू, आत्माचे प्रकल्प अधिकारी अनंत पोटे, औषधी वनस्पती प्रकल्प प्रमुख डॉ. विजू अमोलीक, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. शशिकांत चौधरी, प्रा. योगिता सानप, दत्तात्रय सोनवने, डॉ. अनोकार, डॉ. नेहारकर, देवराव ठाकरे, जितेंद्र कस्तूरे, भैसारे, प्रमोद भांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. पंजाबराव देशमुख, धन्वंतरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
जिल्ह्यात वनविभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या वनौषधीसंबंधी प्रकल्पाची माहिती तसेच वनविभागाच्या योजनांची माहिती श्रीलक्ष्मी अनबतुला यांनी दिली. विविध विभागांनी आपले ज्ञान व तंत्रज्ञानासह हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. एस. पी. लांबे यांनी राहूरी कृषी विद्यापीठाच्या चमूचे कौतूक केले. तसेच शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात करणे ही एक संधी आहे, असे प्रतिपादन केले. पहिल्या सत्रात सुगंधी वनस्पती लागवड, प्रक्रिया याबाबत डॉ. अमोलीक तर दुर्मिळ वनस्पतीबाबत डॉ. शशिकांत चौधरी यांनी माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)