मॉडेल कॉलेज आता सुरू होणार

By Admin | Updated: July 14, 2014 02:10 IST2014-07-14T02:10:26+5:302014-07-14T02:10:26+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत सुरू असलेले मॉडेल

Model college will now start | मॉडेल कॉलेज आता सुरू होणार

मॉडेल कॉलेज आता सुरू होणार

गतवर्षी होते बंद : गोंडवानाच्या पदव्युत्तर विभागात थाटणार काम
गडचिरोली :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत सुरू असलेले मॉडेल कॉलेज मागील सत्रात बंद पडले होते. परंतु आता २०१४-१५ या सत्रात हे कॉलेज सुरू होणार आहे, अशी माहिती मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे यांनी दिली आहे.
चालू सत्रात सदर महाविद्यालय गोंडवाना विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर विभागासाठी गोगाव येथे जी इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच ठिकाणी हे कॉलेजही सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
सत्र २०११ पासून नागपूर विद्यापीठांतर्गत गडचिरोली येथील उपकेंद्राच्या माध्यमातून मॉडेल कॉलेज केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आले होते. परंतु त्यानंतर राज्य शासनाने चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केली. ज्या जागेवर नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र होते. त्या जागेवर नव्या गोंडवाना विद्यापीठाचा कारभार सुरू झाला. गोंडवाना विद्यापीठ व मॉडेल कॉलेज यांच्यातील प्रशासकीय यंत्रणेत जागेवरून वाद उद्भवला. गोंडवाना विद्यापीठाला जागा अपुरी पडते, असे कारण देत मॉडेल कॉलेजला बाहेर करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षी सत्र २०१३-१४ मध्ये मॉडेल कॉलेज बंद होते. सध्या गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या उपकेंद्रात विद्यार्थ्यांना मॉडेल कॉलेजसाठी प्रवेश देणे सुरू आहे व बंद पडलेले मॉडेल कॉलेज पुन्हा सुरू करण्याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सदर कॉलेज २०१४-१५ या सत्रापासून सुरू होईल, असेही जगनाडे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या दर्शनाला
गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे गावागावात महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. दर दोन गावानंतर एक महाविद्यालय असल्यासारखी परिस्थिती आहे. दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणापेक्षा महाविद्यालय अधिक झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. तसेही मॉडेल कॉलेजला विद्यार्थी मिळतच नव्हते.

Web Title: Model college will now start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.