शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची गती मंदावते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:49 IST

Gadchiroli : डॉक्टरांचा रील्सच्या शैलीने मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आई-वडील आणि मुलगा किंवा मुलगी या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेचा मोठा परिणाम सध्या पाहायला मिळत आहे. मूल रडले की त्याला उचलून घेण्यास कुणाकडे वेळ नाही. त्यामुळे मुलाचे रडणे थांबविण्यासाठी आपण त्याच्या हातात मोबाइल देतो. मात्र, हाच मोबाइल मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे.

मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे. ते रील्समधून मातृभाषा सोडून जपानी आणि चिनी भाषा शिकत आहेत. डॉक्टर आता रील्सच्या शैलीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जास्त स्क्रीन टाइममुळे मुले 'ऑटिझम' आजाराला बळी पडत आहेत. रील्स बघत असल्याने आई-वडिलांना त्यांची भाषा समजण्यास अडचण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस मोबाइलचा अतिरेकी वापर धोकादायक ठरणारा आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.

मोबाइल वापरामुळे मुलांवर काय परिणाम ?जास्त स्क्रीन टाइममुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबतो, मुलांचा विकास पूर्णपणे होण्यात अडथळे निर्माण होतात. मोबाइलच्या व्यसनामुळे शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेले खेळही मुले खेळत नाहीत किंवा ते खेळू शकत नाहीत. सामाजिक जाणिवा आणि कौटुंबिक भावना, नातेसंबंध हेदेखील बाळाला कळत नाहीत, त्यामुळे आता बाळाच्या हाती मोबाइल द्यायचा की त्याला दुसऱ्या खेळात गुंतवायचे तुम्हीच ठरवा.

"स्क्रीन टाइम वाढल्याने ७ वर्षापर्यंतच्या मुलांना ऑटिझमचा त्रास होत आहे. त्यांच्यात भाषेचा विकास होत नाही. पडद्यावर दिसणाऱ्या भाषेतील शब्द ते बोलू लागतात. अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मुलाचे मन इतर खेळांमध्ये रमेल यासाठी प्रयत्न करावेत. त्याला विविध प्रकारच्या कला व खेळ शिकवावेत."- डॉ. संजय कन्नमवार, बालरोगतज्ज्ञ

 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यGadchiroliगडचिरोली