शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार मंत्र्यांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:54+5:302021-01-08T05:58:54+5:30

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी राज्याचे अन्न व नागरी ...

MLA minister's door for farmers' rights | शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार मंत्र्यांच्या दारी

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार मंत्र्यांच्या दारी

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याचे साकडे घातले. आधारभूत केंद्रांवर धान खरेदीची मर्यादा केवळ ९.६० क्विंटल इतकी शासनाने केली आहे. गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन हाेत असल्याने धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करावी, अतिक्रमित व वनहक्कधारक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, या शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळाचे सर्व याेजनांचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. अत्यंत किचकट असणाऱ्या ऑनलाईन खरेदी प्रक्रियेमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययाेजना करावी, अशी मागणी आ. डाॅ. हाेळी यांनी ना.भुजबळ यांच्याकडे केली आहे.

Web Title: MLA minister's door for farmers' rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.