हरवलेले मूल पोलिसांच्या तत्परतेने सापडले
By Admin | Updated: September 18, 2016 02:00 IST2016-09-18T02:00:19+5:302016-09-18T02:00:19+5:30
आलापल्ली येथील वॉर्ड क्र. १ मधील राकेश कोरेत यांचा दोन वर्षीय मुलगा आदिल कोरेत हा शुक्रवारी घरून हरविला.

हरवलेले मूल पोलिसांच्या तत्परतेने सापडले
आलापल्ली : आलापल्ली येथील वॉर्ड क्र. १ मधील राकेश कोरेत यांचा दोन वर्षीय मुलगा आदिल कोरेत हा शुक्रवारी घरून हरविला. सदर माहिती मुलाच्या आईने पोलीस हवालदार संतोष मंथनवार व तिरूपती सल्लावार यांना देताच त्यांनी शहरातील गणेश विसर्जनस्थळी पोलीस कर्मचारी नेमून अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस यंत्रणा कामाला लावली. त्यानंतर अनेक ठिकाणी नाकाबंदी करून मुलाचा शोध सुरू केला असता, नागेपल्ली-अहेरी मार्गावर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आदिल कोरेत बसून रडत असल्याच्या स्थितीत आढळून आला. आदिल घरापासून दोन किमी परिसरात भरकटला होता. पोलीस हवालदार संतोष मंथनवार व तिरूपती सल्लावार यांनी आदिल कोरेत याला घरी सुखरूप सोडून दिले. (प्रतिनिधी)