शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जबरदस्तीने घातले मंगळसूत्र अन् केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 12:03 IST

१४ वर्षीय पीडित मुलगी ही गावालगतच्या नाल्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेली हाेती. यावेळी आरोपी तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून घटनास्थळावरून सुभाषग्रामकडे घेऊन गेले.

ठळक मुद्दे दाेन आरोपींना अटक, एक फरार

घोट (गडचिरोली) : रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी रोजीच्या दरम्यान घडली. १० फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून रेगडी पोलीस मदत केंद्र येथे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

सुब्रतो कार्तिक देवनाथ (वय ३० वर्ष), तापस विनय हलदर (वय ३१ वर्ष) दाेघेही रा. सुभाषग्राम अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. चामोर्शी न्यायालयाने त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. विदेश चंडीचरण शहा (वय ३२ वर्ष) हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दिनांक १९ जानेवारी १४ वर्षीय पीडित मुलगी ही गावालगतच्या नाल्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेली हाेती. तिच्या पाठीमागे आरोपी सुब्रतो देवनाथ व तापस हलदर हे मोटरसायकलने जाऊन पीडितेचा हात पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून घटनास्थळावरून सुभाषग्रामकडे घेऊन गेले. अर्ध्या रस्त्यामध्ये तिला विदेश शहा याच्या चारचाकी वाहनात बसवून गावाजवळील तीन पत्थर मंदिरात नेऊन १९ जानेवारीला सायंकाळी ७. ३० वाजता आरोपी सुब्रतो देवनाथ याने मुलीच्या गळ्यात जबरदस्तीने हार टाकून लग्न झाल्याचे सांगितले.

पीडितेला चारचाकी वाहनात बसवून नरेंद्रपूर येथील आरोपीच्या ओळखीच्या सरपंच कृष्णा मंडल यांच्या घरी नेले. तेथे जेवण करून आरोपी सुब्रतो यांनी पीडित मुलीला एकाच रूममध्ये झोपण्यास भाग पाडले. मुलीच्या फिर्यादीवरून रेगडी पोलीस मदत केंद्रात कलम ३६३, ३७६ (३), ५०६, ३४ भादंवि कलम ४,८ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रेगडी पो.केंद्राचे प्रभारी अधिकारी नंदकुमार शिंब्रे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ