आरमाेरीतील सफाई कामगारांच्या मुद्यावर राज्यमंत्र्यांनी घेतली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST2021-07-21T04:25:05+5:302021-07-21T04:25:05+5:30

अन्यायग्रस्त कामगार व त्या संबंधित अधिकारी यांची सिंचन भवन जलसंपदा विभाग नागपूर येथे दि. १९ जुलैला बैठक ...

The Minister of State held a meeting on the issue of cleaning workers in Armari | आरमाेरीतील सफाई कामगारांच्या मुद्यावर राज्यमंत्र्यांनी घेतली सभा

आरमाेरीतील सफाई कामगारांच्या मुद्यावर राज्यमंत्र्यांनी घेतली सभा

अन्यायग्रस्त कामगार व त्या संबंधित अधिकारी यांची सिंचन भवन जलसंपदा विभाग नागपूर येथे दि. १९ जुलैला बैठक लावली. बैठकीत मंत्री कडू यांनी कामगार तसेच अधिकारी व कंत्राटदार यांचे म्हणणे ऐकून घेतले व यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करून कंत्राटदाराने कामावरून काढलेल्या जुन्या ५२ कामगारांना तत्काळ पूर्ववत कामावर घेण्यात यावे. अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या अशी माहिती प्रहारचे निखिल धार्मिक व सफाई कामगाराचे अध्यक्ष अक्षय भोयर यांनी दिली. या बैठकीस प्रहारचे चंद्रपूर-गडचिरोली संपर्क प्रमुख तथा रुग्णसेवक गजू कुबडे, प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोलीचे निखिल धार्मिक, विकास धंदरे, नीलेश डोंगरे, अक्षय भोयर उपस्थित हाेते. याबाबत मुख्याधिकारी माधुरी सलामे यांना विचारणा केली असता जुन्या सफाई कामगारांना कामावर घेण्यासंदर्भात अद्यापही आदेश प्राप्त झाला नाही. फक्त मुख्य नियोक्ता म्हणून नोंदणी करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे, असे सांगितले.

200721\178-img-20210720-wa0051.jpg

आरमोरी येथील सफाई कामगार यांच्या संदर्भात नागपुरात घेतलेल्या बैठकीत ना बच्चू कडू व उपस्थित संबंधित अधिकारी व कामगार

Web Title: The Minister of State held a meeting on the issue of cleaning workers in Armari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.