लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील शिवणी, सायगाव-वघाळा, अरसोडा-मुलुरचक नजीकचा डोमघाट तसेच जोगीसाखरा गावानजीकच्या सती नदीतून बाजार भावानुसार आतापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक किमतीची रेती तस्करी झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या या रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याने शासन व प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.आरमोरी शहरानजीकच्या शिवणी, वघाळा घाट, डोम घाट, डोंगरगावनजीकची नदी, जोगीसाखरा नजीकच्या नदीमधून लाखो रुपयांच्या रेतीची दररोज तस्करी केली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर चोरीची रेती तीन हजार रुपयांपासून पाच हजार रुपये ट्रॅक्टरनुसार आरमोरी शहराच्या शासकीय व खासगी बांधकामांना पुरविल्या जात आहे. तालुक्यातील ट्रॅक्टरमालकांनी रेती पुरविण्याचा सपाटा लावल्याने या मालकांना अभय कुणाचे, अशी चर्चा सुरू आहे.रेती तस्करीमुळे शासन व प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने ‘त्या’ ट्रॅक्टर मालकाचा शोध घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, त्यांच्याकडून भरपाई वसूल करावी, अशी मागणी होत आहे. आरमोरी शहरात कोरोनाच्या संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू असताना रेतीची चोरी कशी झाली व आजही होत आहे, याबाबत महसूल विभाग अनभिज्ञ आहे काय, असा प्रश्नही निर्माण होत आहे. सदर रेती तस्करी रॅकेटमध्ये कोणकोणत्या ट्रॅक्टरमालकाचा समावेश आहे हे वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची गरज आहे. आरमोरी तालुक्यातील शासकीय व खासगी इमारत कामे चोरीच्या रेतीवरच सुरू असल्याचे दिसून येते.मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत चालते वाहतूकआरमोरी शहरातील १४ ट्रॅक्टर चालक व मालक रेती चोरीबाबत युनियन करून हा गोरखधंदा सुरू केला आहे. तालुक्यातील नदीघाटातून पहाटे २ वाजतापासून सकाळी ६ वाजता या वेळेत रेतीचे खनन करून वाहतूक केली जात आहे. शिवणी घाटाकडे गावामधून जावे लागत असताना सुद्धा रेती तस्करीकडे कोतवाल व तलाठ्यांचे दुर्लक्ष कसे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ट्रॅक्टर मालक व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरू आहे.
आरमोरी तालुक्यात लाखोंच्या रेतीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST
आरमोरी शहरानजीकच्या शिवणी, वघाळा घाट, डोम घाट, डोंगरगावनजीकची नदी, जोगीसाखरा नजीकच्या नदीमधून लाखो रुपयांच्या रेतीची दररोज तस्करी केली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर चोरीची रेती तीन हजार रुपयांपासून पाच हजार रुपये ट्रॅक्टरनुसार आरमोरी शहराच्या शासकीय व खासगी बांधकामांना पुरविल्या जात आहे.
आरमोरी तालुक्यात लाखोंच्या रेतीची तस्करी
ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याची मागणी : १४ ट्रॅक्टर मालकांचे रॅकेट सक्रिय