अवैध रेती वाहतूक झाल्यास लाखोंचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:35 IST2018-02-12T23:35:14+5:302018-02-12T23:35:31+5:30

अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नियम अतिशय कडक केले आहेत. १२ जानेवारी रोजी याबाबत अधिसूचना काढली रेतीची अवैध वाहतूक झाल्यास संबंधित वाहनावर लाखो रूपयांचा दंड ठोठावला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Millions of penalties in case of illegal sand traffic | अवैध रेती वाहतूक झाल्यास लाखोंचा दंड

अवैध रेती वाहतूक झाल्यास लाखोंचा दंड

ठळक मुद्देअधिसूचना : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नियम अतिशय कडक केले आहेत. १२ जानेवारी रोजी याबाबत अधिसूचना काढली रेतीची अवैध वाहतूक झाल्यास संबंधित वाहनावर लाखो रूपयांचा दंड ठोठावला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ड्रिल मशीनच्या सहाय्याने रेती उपसा केला जात असल्याचे आढळून आल्यास २५ हजार रूपयांचा दंड, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्राली, हाफ बॉडी ट्रक, सक्शनपंप यांच्याद्वारे अवैध वाहतूक झाल्यास एक लाखांचा दंड, फूल बॉडी ट्रक, डम्पर, ट्रॉलर, कम्प्रेसरवर दोन लाख रूपयांचा दंड, ट्रॉलर, बार्ज, मोटोराईज्ड बोटवर पाच लाख रूपयांचा दंड व एक्सकॅवेटर, मॅकेनाईज्ड लोडरच्या माध्यमातून अवैध वाहतूक झाल्यास ७ लाख ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला जाईल. दंड ठोठावण्याबरोबरच रेती बाजारभावाच्या पाचपट दंड सुध्दा आकारण्यात येईल. वैयक्तिक जातमुलक्यात वाहनधारकाच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक अचल संपत्तीचा तपशील द्यावा लागेल. जातमुलक्याचा भंग झाल्यास जातमुलक्याची रक्कम आणखी वाढविली जाईल. जप्त केलेली यंत्र सामग्री, वाहन भविष्यात अनधिकृत गौणखनिज वाहतुकीसाठी वापरले जाणार नाही, याची हमी जातमुलक्यात द्यावी लागेल, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरेश चौधरी, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंग गौंड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर हजर होते.

Web Title: Millions of penalties in case of illegal sand traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.